एनसीपी कोअर कमिटीने शरद पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. शरद पवार यांनीच पक्षांचं नेतृत्त्व करावं असे कोअर कमिटी कडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध केला आहे. कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून शरद पवार यांनी पुन्हा विचार करण्यासाठी 2-3 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र आज ती मुदत संपणार असून शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पहा ट्वीट
NCP's Core Committee passes a proposal requesting party chief Sharad Pawar to continue to lead the party. https://t.co/ZtMdfofcAw pic.twitter.com/kH3e0YO4ah
— ANI (@ANI) May 5, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवड समितीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, मुंबई येथे संपन्न होत आहे. या बैठकीत आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या घोषणेच्या अनुषंगाने पुढील चर्चा करण्यात येत आहे.#NCP@PawarSpeaks pic.twitter.com/Qi1xIdar72
— NCP (@NCPspeaks) May 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)