राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षप्रमुख शरद पवार पक्षावर आपापले दावे करत आहेत. अशात आता पुन्हा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागालँड युनिटचे अध्यक्ष वांथुंगो ओडियुओ (Vanthungo Odyuo) यांनी सांगितले की, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही आमदारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. (हेही वाचा: Women Commission Letter To Mumbai Police: किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना पत्र)
All the seven NCP MLAs in Nagaland have sent a letter of support to Ajit Pawar, Deputy Chief Minister Maharashtra:Vanthungo Odyuo, President of the Nagaland unit of the Nationalist Congress Party
— ANI (@ANI) July 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)