महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. फोगाट यांची अपात्रता म्हणजे "आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण" असल्याची भावना पटोले यांनी व्यक्त केली आहे. भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याच्या जवळ असलेल्या फोगटला महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे
विनेश फोगटच्या अपात्रतेमुळे भारतीय क्रीडा रसिकांमध्ये निराशा पसरली आहे. किंचित जास्त वजन असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आल्याने क्रीडा जगतात मोठ्या प्रमाणावर टीका आणि अनुचित पद्धतींचे आरोप झाले आहेत. (हेही वाचा, Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट अपात्र, वाढत्या वजनाचे निमित्त; Paris Olympics 2024 मध्ये भारताला मोठा धक्का)
व्हिडिओ
#WATCH | Mumbai: On Vinesh Phogat's disqualification, Maharashtra Congress President Nana Patole says, "This is international level politics. Vinesh Phogat was very close to winning a gold medal for the country. The intention with which she has been removed is sports politics...… pic.twitter.com/cZ99T5hPLs
— ANI (@ANI) August 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)