भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसह पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे. सोबतच, शहर आणि उपनगरांसाटी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD ने लागू केलेला हा अलर्ट महाराष्ट्रातील कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांसह आजूबाजूच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या लोकल ट्रेनबाबत मध्य रेल्वेने महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईत पाऊस कोसळत असला तरी, सर्व रेल्वे गाड्या वेळेत धावत आहेत. तसेच, त्यांची वाहतूकही सुरळीत असल्याचे मध्य रेल्वेने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Weather Forecast: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, शहर आणि उपनगरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या हवामान अंदाज)
एक्स पोस्ट
#CR Monsoon Updates at 7:30 hrs on 12.07.2024.#CRUpdates pic.twitter.com/TSlG9DUhci
— Central Railway (@Central_Railway) July 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)