भर पावसाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या इतिहासात बहुदा हे पहिल्यांदाच घडत असावे किंवा यापूर्वी अपवादानेच घडले असावे. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाला आणि पावसाने ओढ दिली. परिणामी मुंबईला पुढचे काही दिवसच पुरेल इतके पाणी तलावांमध्ये शिल्लख राहिले. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली. दरम्यान, स्थिती हळुहळू बदलत आहे. याची प्रचिती तुळशी धरमाने दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ओसंडून वाहू लागले आहे. हळूहळू इतर धरणेही भरली जातील अशी आशा आहे.
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra | Tulsi, one of the lakes supplying water to Mumbai, begins to overflow.
(Video Source: BMC) pic.twitter.com/rM1h05cbGo
— ANI (@ANI) July 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)