Mumbai-Pune Expressway Traffic Block: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना काळजीपूर्वक नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर बांधकाम कामासाठी तीन दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवेवर किलोमीटर 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) येथे नवीन पुलासाठी गर्डर बसवणार आहे. उद्या, 22 जानेवारी ते 24 जानेवारी 2025 या कालावधीत दररोज दुपारी 12 ते दुपारी 3 दरम्यान हा वाहतूक ब्लॉक लागू असेल. या कालावधीत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वाळवण येथील 54/700 किलोमीटरवरून देहू रोड मार्गे (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) वरसोली टोल प्लाझाकडे वळवण्यात येईल.

त्याचप्रमाणे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कोणत्याही बदलाशिवाय एक्स्प्रेस वेचा वापर करत राहील. पुढील 3 दिवस दररोज दुपारी 3 नंतर, मुंबई-पुणे कॅरेजवेवरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होईल. प्रवाशांना विलंब टाळण्यासाठी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रॅफिक ब्लॉक दरम्यान कोणतीही अडचण आल्यास वाहनचालकांना द्रुतगती मार्गावरील नियंत्रण कक्षाशी 9822498224 किंवा  9833498334 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. (हेही वाचा: Pune University Flyovers: पुणेकरांसाठी दिलासा! विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी पावसाळ्यापूर्वी सोडवली जाणार; बाणेर, औंध आणि पाषाणकडे जाणारे उड्डाणपूल 15 जूनपर्यंत सुरु होण्याची शक्यता)

Mumbai-Pune Expressway Traffic Block:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)