नागपाडा येथून अपहरण झालेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासात सुटका केली आहे. मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हालवली. पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी मुलीला घेऊन पश्चिम बंगालच्या दिशेने जात आहे. ही माहिती मिळताच तातडीने गुन्हे शाखा जीआरपीएफ पोलिसांची मदत घेऊन शेगाव येथून चालत्या एक्सप्रेसमधून आरोपीस पकडले आणि मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर तपास पूर्ण होताच मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तर, आरपीला अटक करण्यात आली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)