आगरा येथून आलेल्या एका कुटुंबातील सात वर्षांची मुलगी हरवली होती. मुलगी हरवल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मात्र, मुंबई पोलिसांनी कसून शोध घेत आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या सात तासात या मुलीचा शोध लावला आणि ही मुलगी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरी पोलिसांकडून, 2 पथके तयार करून, कसून चौकशी करण्यात आली व मुलीस सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात सोपवण्यात आले.
६ तासांची अथक शोधमोहीम!
आपली सात वर्षांची मुलगी हरवल्याचे लक्षात येताच आगरा येथून मुंबईत आलेल्या कुटूंबाला काळजी वाटू लागली.
व.पो.नि. शबाना शेख यांच्या मार्गदर्शनात डोंगरी पोलिसांकडून, २ पथके तयार करून, कसून चौकशी करण्यात आली व मुलीस सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात सोपवण्यात आले. pic.twitter.com/P5Ek6l29Nd
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)