मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल रविवारी देखभालीसाठी, दुरूस्ती साठी काही काळ बंद केली जाते. उद्या 11 फेब्रुवारी दिवशी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. यामध्ये हार्बर लाईन वर वाशी ते पनवेल, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव वर ब्लॉक असणार आहे.
पहा ट्वीट
रेल्वे रूळ, सिग्नल प्रणाली तथा ओव्हरहेड उपकरणांची देखभाल करण्यासाठी, सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवार, 11 फेब्रुवारी 2024, रोजी सकाळी 10:00 ते 15:00 या वेळेत 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल.@drmbct #JumboBlock #MumbaiLocal pic.twitter.com/EOjqE7aP41
— Western Railway (@WesternRly) February 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)