मुंबईमध्ये एका 30 वर्षीय अविवाहित महिलेने एका अब्जाधीश उद्योगपतीवर बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने याबाबत बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहेत. मात्र या उद्योगपतीच्या कंपनीच्या समूहाचे प्रवक्ते आणि कॉर्पोरेट जायंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलच्या प्रश्नांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडितेने सांगितले की, ही घटना 24 जानेवारी, 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास घडली. उद्योगपतीने कथितपणे तिचा हात धरून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कंपनीच्या कॉर्पोरेट इमारतीच्या वर असलेल्या पेंटहाऊसच्या बाथरूममध्ये नेले. जेथे त्याने कथितपणे तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने ओरल सेक्स केला, असा आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेने सांगितले की, उद्योगपती हा एक शक्तिशाली व्यक्ती असल्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला इजा होऊ शकते या भीतीने तिने ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला नाही. त्यानंतर तिने 16 फेब्रुवारी 2023 रोजी बीकेसी पोलीस ठाण्यात केली होती, परंतु उद्योगपतीच्या लोकांनी तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. शेवटी, तिने 13 डिसेंबर 2023 रोजी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 376, 354 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Thane Shocker: 'मला न्याय हवाय... !' ठाण्यात बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रेयसीला SUV ने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न; पिडीतेने सोशल मिडियावर कथन केली घटना)
Mumbai: 30-Year-Old Woman Doctor Accuses JSW Steel MD Sajjan Jindal Of Rape; #FIR Lodged #BKC #Mumbai #jswsteel #SajjanJindal #Rape #Sajjan #Jindalhttps://t.co/kKNfoPWGoc
— Free Press Journal (@fpjindia) December 16, 2023
Big Breaking -
*उद्योगपति सज्जन जिंदल के खिलाफ रेप का मामला दर्ज*
*एक महिला ने सज्जन जिंदल के खिलाफ शादी का झांसा देकर शारीरिक शोषण और रेप का आरोप लगाया*
*मुंबई के बांद्रा कुर्ला कंपलेक्स थाने में सज्जन जिंदल के खिलाफ रेप का फिर दर्ज हुआ*@BhaaratExpress #SajjanJindal
— Abhishek Pandey - अभिषेक पाण्डेय (@abhishekpandey2) December 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)