मुंबई- गोवा हायवे च्या रखडलेल्या कामावरून मनसे आक्रमक झाल्यानंतर आता सरकार देखील कामाला लागलं आहे. राज्य सरकारने कोकणवासियांना गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका खुली करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार आता अवघ्या 10-12 दिवसांवर गणपती आले असताना या मार्गिकेचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. त्यांनी नुकतीच कामाची पाहणी देखील केली आहे.
पहा ट्वीट
यंदाचा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोकणवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरु असून, मुंबई - गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज पाली रत्नागिरी येथील रस्त्याच्या टप्प्याची पाहणी करून… pic.twitter.com/DUnctUBHD7
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) September 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)