गुढीपाडव्यानिमित्त राज्यभर उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, पुणे, नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा विविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले. मुंबई येथील गिरगाव परिसरातही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शोभायात्रेत एक कोणाचा तरी कुत्रासुद्धा सहभागी झाला होता. सहभागी झाला होता की मालसासोबत चुकून आला होता याची कल्पना नाही. मात्र, कठापदराचा ड्रेस घालून आणि कपाळावर चंद्रकोर काढून सहभागी झालेल्या या कुत्र्याला पाहून अनेक जण खूश झाले. या कुत्र्याचे आणि कुत्र्यासोबतही फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)