मुंबईत गणपती विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक चौपाटीवर मूर्तींचे विसर्जन पाहण्यासाठी जमतात. यावेळी अनेक तास गणपतींची मिरवणूक चालू असते. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, 17-18 सप्टेंबरच्या मध्यरात्री अतिरिक्त लोकल ट्रेन चालवल्या जातील. पश्चिम रेल्वे 8 विशेष सेवा चालवणार आहे, जेणेकरून गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरी सहज पोहोचता येईल. या विशेष गाड्या पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या सेवा दिलासादायक ठरतील.
चर्चगेट ते विरार ही शेवटची लोकल पहाटे 3.20 वाजता सुटेल, तर विरार ते चर्चगेट शेवटची ट्रेन पहाटे 3 वाजता सुटेल. या गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. यासह मध्य रेल्वे मुंबई विभागही 14 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 या कालावधीत सीएसएमटी ते कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यान गणपती विशेष उपनगरीय लोकल चालवणार आहे. (हेही वाचा: Ganpati Special Local Trains: प्रवाशांना दिलासा! मध्य रेल्वे 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान चालवणार CSMT आणि Kalyan/Thane/Panvel दरम्यान गणपती विशेष लोकल; जाणून घ्या वेळा)
पश्चिम रेल्वे चालवणार चर्चगेट व विरारदरम्यान 8 विशेष लोकल-
WR has decided to run 8 additional special local trains between Churchgate and Virar on the occasion of Ganpati immersion during the night of 17th/18th September 2024 for the convenience of devotees and to meet the high travel demand.#WRUpdates pic.twitter.com/a4aggJu5Fx
— Western Railway (@WesternRly) September 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)