मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जामीन आर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मोठा फटका मानला जात आहे. पाठीमागील अनेक महिन्यांपासून नवाब मलिक हे ईडी कोठडीत आहेत. त्यांनी कोठडीतून बाहेर येण्यासाठी जामीन मागितला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे. त्यामुळे आता मलिक यांची पुढची रणनिती कशी असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
Money laundering case | PMLA Court rejects the bail application of NCP leader and Maharashtra's former minister Nawab Malik.
(File photo) pic.twitter.com/2rLXHg3wgI
— ANI (@ANI) November 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)