MLA Hiraman Khoskar Joins Ajit Pawar Faction: इगतपुरीतील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांच्या समर्थकांसह खोसकर यांनी पक्षात प्रवेश केला. हिरामण खोसकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा अमेक दिवसांपासून रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. अहवालानुसार काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची कुणकुण राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर त्यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 आमदार आहेत. यात हिरामण खोसकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. (हेही वाचा: Maharashtra, Jharkhand Election 2024: महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांबाबत उत्साह, EC लवकरच करणार निवडणुकीच्या तारखा जाहीर)
इगतपुरीतील आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश-
Maharashtra | Congress MLA from Igatpuri Hiraman Khoskar joins NCP (Ajit Pawar faction). Khoskar joins the party with his supporters at Dy CM Ajit Pawar’s residence in Mumbai.
(Pic Source: NCP) pic.twitter.com/h6RJNhZoz0
— ANI (@ANI) October 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)