राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात, सीबीआयटीचा दक्षता विभाग आणि सीमाशुल्क विभागाकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. 'वानखेडे यांच्या नावावर 29 ऑक्टोबर 1997 पासून आजपर्यंत परमिट रूम आणि बार लायसन्स आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी त्याच्या नावावर परमिट रूम आणि बार लायसन्स ठेवण्यास आणि चालविण्यास पात्र आहे का? असा सवाल त्यांनी पत्रातून उपस्थित केला आहे. याबाबत वस्तुस्थिती, प्रशासकीय गैरव्यवहारांची नोंद घ्या आणि या प्रकरणाची योग्य चौकशी करा, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
"Is a Central govt servant eligible to hold & operate a Permit Room & Bar License in his name? Please take a note of facts, of administrative misconducts... & conduct proper Inquiry in the matter," the complaint letter further reads
— ANI (@ANI) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)