महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी असा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत फेसबुक इंडिया आणि महाराष्ट्र सायबरकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. मुंडे यांचे सबुक पेजचे लाखो फॉलोअर्स आहेत.
माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. pic.twitter.com/CxzrPcfzC7
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)