17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din) म्हणून साजरा केला जातो. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अनोख ट्वीट (Tweet) केलं आहे. हैद्राबादच्या (Hyderabad) निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील (Marathwada) जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे! तसेच मनसेकडून एक अधिकृत पत्रक काढत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)