मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे हे 25 ऑक्टोबरपासून त्यांच्या मूळ जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा केली. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून जरांगे यांना दिले.
आता माहिती मिळत आहे की, आज झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी मागासवर्ग आयोगाने नवीन प्रायोगिक डेटा गोळा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. (हेही वाचा: Manoj Jarange Patil News: 'पाणी पितो पण दोनच दिवस'; मनोज जरांगे पाटील यांच्याकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या विनंतीस मान)
✅ मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत.
- कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 31, 2023
Maharashtra | During the Maharashtra Cabinet meeting today, the interim report of Justice Sandeep Shinde Committee on providing reservation to the Maratha community was accepted by the Cabinet. It was decided in the meeting that the procedure to issue Kunbi caste certificates to…
— ANI (@ANI) October 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)