Mumbai: मुंबईत 100 किलो वजनाचा बॉम्ब असल्याचा खोटा दावा करून मुंबई पोलिसांना फोन केल्याप्रकरणी एका 43 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आरोपी रुखसार अहमदने चौकशीदरम्यान खुलासा केला की, त्याने गेल्या पाच महिन्यांत मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला विविध तक्रारी आणि समस्यांबाबत 79 फोन कॉल केले होते. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालवणी येथील रहिवासी असलेल्या रुखसारने शनिवारी रात्री उशिरा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला की, मुंबईत 100 किलोचा बॉम्ब ठेवला आहे. ते म्हणाले की, एका फोन कॉलच्या आधारे पोलिसांना आरोपी मालवणीत असल्याची माहिती मिळाली आणि त्याला अटक केली. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)