मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील अनेक साक्षीदार पाठिमागील काही दिवसांपासून फितूर होऊ लागले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. साक्षीदाराने म्हटले की, त्याने एटीएसला दिलेल्या जबाबातील बहुतांश गोष्टी त्याला आठवत नाहीत. हा साक्षीदार मध्य प्रदेश येथील येका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याने मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींसाठी कधीतरी खोल्या बूक केल्या होत्या. या प्रकरणातील 31 साक्षीदार आतापर्यंत फितूर झाले आहेत. आजचा हा 32 वा साक्षीदार आहे जो फितूर झाला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट 2008 मध्ये घडला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)