येत्या रविवारी, म्हणजेच 15 जानेवारी रोजी देशभरात वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती साजरी होणार आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या निमित्ताने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना तिळगुळ, तिळाचे लाडू देण्याची प्रथा आहे. आता भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस (Alex Ellis) यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, ज्यामध्ये ते ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’, अशा शुभेच्छा देताना दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)