मागील काही दिवस सुरू असलेला ऊन पावसाचा खेळ सध्या थांबला आहे. मुंबई सह किनारपट्टीच्या अनेक भागात जोरदार सरी बसरत आहेत. मुंबईतही आज जोरदार पाऊस आहे. दरम्यान या आठवड्यात पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये 17 जुलै दिवशी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे तर 18 जुलैला रत्नागिरी, रायगड सह पुण्यालाही ऑरेंज अलर्ट दिला असल्याने जोरदार पावासाची शक्यता आहे. अद्याप राज्यात दमदार पाऊस झालेला नाही त्यामुळे अनेक जलसाठे पुरेसे भरलेले नाहीत. परिणामी अनेक ठिकाणी ऐन पावासाळ्यात पाणीकपातही जाहीर केलेली आहे.
पहा ट्वीट
Gradual enhancement in rainfall activity over Konkan and adjoining ghat areas of Madhya Maharashtra during next 4-5 days. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD भेट द्यI pic.twitter.com/vaFdJteKEn
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)