राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून आज  संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Atithigruh) चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजत करण्यात आला होता. पण विरोधी पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत विरोधी पक्षाकडून चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेत याबाबत माहिती दिली आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच जर चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकत असतील तर यावेळचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)