अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने विशेष मासिक भत्ता जाहीर केल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या भत्ता अंतर्गत विद्यार्थ्यांना 3000-3500 रुपये प्रति महिना विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. तर अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम 3,500 रुपये तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक 3 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
पहा ट्विट:
अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक ३ हजार रुपये मिळणार. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)