महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (29 जून) 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' ही सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्र योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे वृद्धांना मदत होईल जे स्वतःहून तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकत नाहीत, अशांना या योजनेमुळे फायदा होणार आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना शिंदे यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. या योजनेसाठी नियम तयार केले जातील आणि सरकार सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थयात्रेची सोय करेल.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #तीर्थदर्शनयोजना सुरू करण्याचे विधानसभेत जाहीर केले.
या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल -मुख्यमंत्री#ज्येष्ठनागरिक#तीर्थयात्राpic.twitter.com/DaZdHKPzCw
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)