अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीनंतर आता देशभरातून भाविकांचा ओघ तेथे दर्शनाला येण्यासाठी वाढला आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या भाविकांसाठी अयोद्धेमध्ये सोय व्हावी म्हणून  आता राज्य सरकार कडून महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे. त्याकरिता 2 एकर भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारने मंजूरी दिली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आता हे महाराष्ट्र सदन येत्या 2 वर्षात उभं राहणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)