शिवसेनेपाठोपाठ एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर आता महाविकास आघाडीचं भविष्य काय? याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या बैठकीतही आज तसा निर्णय झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मुंबईत दाखल झालेल्या शरद पवारांना आज कॉंग्रेसचे नेते भेटले आहेत. वायबी चव्हाण सेंटर मध्ये आज शरद पवारांनी कॉंग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे. उद्या 5 जुलै दिवशी अजित पवार आणि शरद पवार दोघांनीही आमदारांची बैठक बोलावली आहे त्यामुळे कुणाच्या पाठीशी आमदार उभे राहणार याचं चित्र उद्याच स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)