महाराष्ट्रामध्ये आता शिवसेना पाठोपाठ एनसीपी पक्षातही उभी फूट पडली आहे. अजित पवार आमदारांचा एक मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने विरोधीपक्ष नेतेपद आता कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज मुंबईत महाराष्ट्र कॉंग्रेसने बैठक बोलावली आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली ही बैठक होणार असून सध्याच्या राजकीय घडामोडींवरही त्यामध्ये चर्चा होणार आहे. अजित पवारांनी एनसीपी वर दावा केल्यानंतर सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस सभागृहामध्ये असणार आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद येणार आहे. Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनंतर Nana Patole सह कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत घेतली शरद पवारांची भेट .
पहा ट्वीट
Maharashtra Congress calls a meeting of Congress Core Committee today in Mumbai. The meeting will be chaired by the party's state president Nana Patole. Discussions on Opposition Leader and the current political situation in the state are expected to be held in the meeting.…
— ANI (@ANI) July 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)