Maharashtra Assembly Monsoon Session: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, 27 जून ते शुक्रवार, 12 जुलै 2024 या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार 29 जून 2024 सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले. (हेही वाचा: अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वत:ची किंमत कमी केली: संघ मुखपत्रातून टीकास्त्र)
पहा पोस्ट-
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून ते १२ जुलै दरम्यान मुंबईत होणार आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते pic.twitter.com/PQETVg2mMj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)