Mahaparinirvan Diwas: आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवसाचे औचित्य साधत देशभरात बाबासाहेबांना अभिवादन केले जात आहे. मुंबईमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेबांना नमन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झाले. त्यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला. (हेही वाचा: Mahaparinirvan Din Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status द्वारे अर्पण करा आदरांजली!)

69th Mahaparinirvan Diwas:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)