Foreign  Delegates to Observe Raigad Polls: भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था (EMBs) यांच्याबरोबर, आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधी मंडळ निवडणूक प्रक्रीयेची पाहणी करण्याकरीता 6 ते 8 मे 2024 या कालावधीत रायगड जिल्ह्याला भेट देणार आहे. सदर प्रतिनिधी मंडळामध्ये 7 सदस्य असून हे सदस्य रायगड लोकसभा मतदार संघातील विविध ठिकाणी भेट देऊन, निवडणूक प्रक्रियेची पाहणी करणार आहेत. महाराष्ट्रातील केवळ रायगड जिल्ह्यामध्येच हे मंडळ भेट देणार आहे.

या विदेशी प्रतिनिधी मंडळमध्ये बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी, जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी), कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी- नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलजा हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका), झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बोबे) यांचा समावेश आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळाने आज 6 मे रोजी सकाळी 9 वा अलिबाग येथे मतदान प्रक्रियेची पाहणी केली. उद्या, 7 मे रोजी विविध मतदान केंद्राना भेटी देऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेची माहिती घेणार आहेत. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशभरात 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)