स्वर कोकिळा लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजेच 6 फेब्रुवारी 2022 रोजी लतादीदींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या रूपाने भारताने एक अनमोल रत्न गमावले. आज लतादीदींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लतांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी षण्मुखानंद सभागृहाच्या चौकात मुंबई पोलिसांच्या बँडतर्फे लतादीदींची काही निवडक गाणी वाजवून त्यांना मानवंदना देण्यात आली. आशिष शेलार यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आज लतादीदींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित #लतांजली कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी षण्मुखानंद सभागृहाच्या चौकात मुंबई पोलिसांच्या बँडतर्फे लतादीदींची काही निवडक गाणी वाजवून त्यांना मानवंदना देण्यात आली.@MumbaiPolice @MerakEvents @BJP4Mumbai #LataMangeshkar #Latanjali pic.twitter.com/FEKaYyChWl
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)