भटक्या कुत्र्यांनी आणि अनेकदा पाळीव कुत्र्यांनी सोसायटी आणि पादचारी मार्गावली नागरिकांना चावल्याच्या अनेक घटना या आधी घडल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. दरम्यान, कोल्हापूर येथे एका रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनाही भटक्या कुत्र्यांचा वावर पाहावा लागला. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांचे रुग्णालयात आगमन होताच भटकी कुत्री इकडे तिकडे धावाधवा करत होती. या वेळी अधिकाऱ्यांचीही चांगलीच भंभेरी उडाली. त्यातच रुग्णालयात काय कुत्री पाळली आहेत का? असा सवाल उपस्थित करताच अधिकाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)