कोल्हापूर आणि सांगली येथील पूर निवारणासाठी 400 दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणतात, 'कोल्हापूर आणि सांगली येथील पूर निवारणासाठी 400 दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल माननीय पीएम नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन आणि जागतिक बँकेचे आभार. या प्रकल्पात, $280 दशलक्ष जागतिक बँक आणि राज्यांकडून $120 दशलक्ष योगदान देण्यासाठी वित्तपुरवठा केला जाईल.'

ते पुढे म्हणतात. 'पुराच्या काळात अतिरिक्त पुराचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवण्याच्या संधी आम्ही शोधू. या एकाच प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला फायदा होणार आहे.' (हेही वाचा: Mumbai Coastal Road Update: कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी अखेर खुला होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)