बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत संकेतने रौप्यपदक पटकावले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. सांगली शहरातील संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. त्याच्या या कामगिरीबद्दल जयंत पाटलांनी त्याच्याकडे संवाद साधला आहे. त्यांनी त्याने केलेल्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)