मुंबईच्या (Mumbai ) जोगेश्वरी (Jogeshwari ) पूर्वेकडे एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन एक लोखंडी रॉड प्रवासी रिक्षावर पडल्याने एक  मोठा अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात रिक्षातू प्रवास करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सहा वर्षाच्या मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Expressway) सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर घडली आहे. या प्रकरणांमध्ये मलकानी डेव्हलपरचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपघात नेमका कसा झाला, यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)