दिव्यांग व्यक्तीस परिस्थितीपेक्षा शारीरिक मर्यादेमुळेच प्रगतीस अनेकदा मोठा अडथळा येतो. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकास आणि कामगिरी यांचा मोठाच प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीत नागपूर येथील जयसिंग चव्हाण यांनी मात्र अत्यंत धडाडीने स्वत: ला सिद्ध केले आहे. त्यांच्या या धडाडीची प्रेरणा अनेकांना बळ देते आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपणही हा प्रेरणादायी व्हिडिओ नक्की पाहू शकता. कौतुकास्पद असे की, आपल्या शारीरिक मर्यादेवर मात करत ते परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर 20 वर्षात 250 कोटींच्या व्यवसायाचे मालक झाले आहेत.आज राष्ट्रपती यांच्या हस्ते सर्वश्रेष्ठ दिव्यांग पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)