Garudzep Academy Beating Student video:  छत्रपती संभाजीनगर येथील गरुडझेप अॅकडमीतून 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. दरम्यान याच अॅकडमीतून विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याच व्हिडिओ व्हायरल होत आहे. इथल्या विद्यार्थ्यांना अमानुषा मारहाण केल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. स्पर्धा परिक्षेसाठी तरुण मंडळी आपलं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून या अॅकडमीत प्रवेश घेतात. परंतु या अॅकडमीतील सैतानी प्रकार समोर येत आहे. विद्यार्थ्यांना दांड्याने आणि पट्ट्याने मारहाण करताना व्हिडिओत दिसत आहे. 20 फेब्रुवारी रोजी याचं अॅकडमीतील एका  19 वर्षीय विद्यार्थींनी आत्महत्या केली होती. या घटनेअंतर्गत पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)