मुंबई विमानतळावर धमकीचा ईमेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई विमानतळावर इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. शनिवारी रात्री (1 ऑक्टोबर) मुंबई विमानतळावर एक ईमेल आला, ज्यामध्ये इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 6045 मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिले होते. हे विमान रात्री मुंबईहून अहमदाबादला जाणार होते. ईमेल आल्यानंतर तपासले, परंतु फ्लाइटमध्ये काहीही आढळले नाही. बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यानंतर रात्री उशिरा इंडिगोचे विमान उशिराने उड्डाण करण्यात आले. हा ईमेल कोणी आणि का केला याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
A threat email warning of a bomb on an IndiGo flight was received at Mumbai airport yesterday. During the inspection of the flight, nothing was found. Further investigation underway: Mumbai Police
— ANI (@ANI) October 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)