महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) काळात गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि देवेंद्र फडणवीसला (Devendra Fadanvis) अटक करण्याची चर्चा माझ्यासमोर झाली या सर्वांचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. दाऊदची बहीण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा तत्काळीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतला नाही. बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लावला.
पहा ट्विट -
The planning of previous govt was to put Devendra Fadnavis & Girish Mahajan in jail, I was not CM & Home Minister then, but I am a witness to a conspiracy being hatched, that was not allowed to be completed. The government had already taken revenge: Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/R3aQEtvYVp
— ANI (@ANI) February 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)