मुंबई आणि आसपासच्या परिसरात उष्ण हवामानाचा अंदाज आहे. सोमवारीही मुंबई, ठाणे आणि रायगडच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. हवामान खात्याने (IMD) पुढील दोन दिवस उत्तर कोकण, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देऊन यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी मुंबईत 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुढील काही दिवस शहरातील तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून, तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांसाठी तीव्र उष्णतेची लाट असणाऱ्या काही भागांत ऑरेज अलर्ट, तर काही निर्जन भागात येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याकाळात नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी याचे उपाय महानगरपालिकेने शेअर केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)