Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल यांना पत्रकारांना राष्ट्रवादी आणि शरद पवारांची साथ सोडली का? असा प्रश्न केला. पटेल या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं आणि संतापाने काच वर केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रविवारी, राजभवनात घाईघाईने आयोजित केलेल्या शपथविधी सोहळ्याला पटेल उपस्थित होते, जिथे अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आठ नेते, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अधिकृतपणे सरकारमध्ये सामील झाले.
कालच्या घडामोडीनंतर सत्तावाटपासंदर्भात बैठकीसाठी पटेल आज सकाळी अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. माजी केंद्रीय मंत्री यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबतचं आहोत. अजित पवारांसोबतच्या सत्तापालटानंतरच्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून त्यांच्यासाठी संभाव्य केंद्रीय मंत्रिपदाच्या अटकळींबद्दल विचारले असता पटेल म्हणाले, आम्ही दिल्लीबद्दल काहीही चर्चा केलेली नाही, आम्ही फक्त महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापनेबद्दल चर्चा केली आहे. (हेही वाचा - Sharad Pawar In Action: शरद पवार यांचा दणका; थेट कारवाई, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे निलंबीत)
#WATCH | NCP leader Praful Patel, says "We are the NCP and that is what we are doing. We will decide now if I have to go to Delhi. We have not discussed anything about Delhi, we have only discussed about the formation of our government in Maharashtra" pic.twitter.com/Wp4e3X7RIi
— ANI (@ANI) July 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)