संघप्रमुख मोहन भागवत यांनी देश आणि जगाच्या सध्याच्या परिस्थितीवर संघाचा दृष्टिकोन सर्वांसमोर ठेवला आहे. नागपुरात संघ शिक्षा वर्गाच्या तिसऱ्या वर्षाच्या समारोप समारंभात मोहन भागवत उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी ज्ञानवापीसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ज्ञानवापीबाबतच्या हिंदू-मुस्लिम वादावर संघप्रमुख म्हणाले, ‘आपण इतिहास बदलू शकत नाही. इस्लाम बाहेरून आक्रमणकर्त्यांद्वारे आला. भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांचे मनोधैर्य खचवण्यासाठी त्यांनी देवस्थाने उद्ध्वस्त केली. आता हिंदूंच्या श्रद्धेशी संबंधित अनेक ठिकाणी मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. ज्ञानवापीशी आपली भक्ती जोडली गेली आहे परंतु प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे? रोज नवीन एक प्रकरण का शोधून काढायचे? तसे करणे योग्य नाही.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)