मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील कोपीनेश्वराचे दर्शन घेतले. या वेळी ते चै पाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेतही सहभागी झाले. राज्यभरात साजरा होणाऱ्या गुढीपाडवा सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांचा भाग आणि परंपरा म्हणून ठाणे येथील श्री अंबे माता चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेलाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली.
व्हिडिओ
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी ठाण्यातल्या कोपीनेश्वराचं दर्शन घेऊन चैत्र पाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेला सहभागी झाले. @CMOMaharashtra #gudhipadwa #हिन्दू_नूतन_वर्ष #गुढीपाडवा pic.twitter.com/VMrPnAZZvr
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 22, 2023
श्री गणेश मंदिर संस्थेच्या वतीनं डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष शोभा यात्रेतही मुख्यमंत्री सहभागी झाले. @mieknathshinde @CMOMaharashtra @DDNewslive @DDNewsHindi #gudhipadwa #Gudhipadwa2023 https://t.co/KPev2OCVTk
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)