सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 5.71 कोटी रुपयांचे 9.482 किलोग्राम सोने जप्त केले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. सोमवार ते गुरुवार दरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आठ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.आरोपींनी गुदाशय, हँग बॅग, अंडरगारमेंट्स इत्यादीमध्ये सोने लपवले होते. मुंबई कस्टम्स -III च्या विमानतळ आयुक्तालयाने ही कारवाई केली, असेही हा अधिकारी म्हणाला.
एक्स पोस्ट
Maharashtra | In the last three days, Mumbai customs at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport seized over 9.482 Kg of gold valued at Rs 5.71 Crore. Eight Passengers arrested: Mumbai Customs pic.twitter.com/9zvg3SMmjg
— ANI (@ANI) April 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)