मुंबईचा पाऊस आणि लोकल ट्रेनचा रेल्वे ट्रॅक नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नेहमीच येतो पावसाळा. तसे, प्रत्येक पावसाळ्यातच साचते ट्रॅकवर पाणी. मुंबईकरांना हे आता सवयीचे झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात हे असेच होते. यंदाचा पावसाळा काहीसा निराळा. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे बहुदा ट्रॅकचा पहिल्यांदाच फिशटँक झाला. रुळावर पाणी या आधीही साचत असे. यंदा मात्र, त्या पाण्यात मासे पोहताना दिसले.

Suresh Kumar Kurapaty नावाच्या एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने @kurafatygyan नावाच्या हँडलवरुन याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यानेच दिलेल्या माहितीनुसार कॅटफीश म्हणून ओळखले जाणारे मासे पोहताना आढळतात. अर्थात हा व्हिडिओ मुंबईचा आहे हे निश्चित ओळखता येते. मात्र, तो नेमका कोणत्या स्टेशनवरचा आहे, याबाबत मात्र निश्चित माहिती उपलब्ध नाही. आपणही हा व्हिडिओ पाहू शकता.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)