Jaipur Express Firing: मुंबई शहराला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुंबईला येणाऱ्या जयपूर एक्स्प्रेस (Jaipur Express ) ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याने यामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही ट्रेन गुजरातमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) दाखल होताच दरम्यान या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. या घटनेत एका आरपीएफ पोलिसासह 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. गोळीबार करताच आरोपी घटनास्थळा वरून फरार झाला. दरम्यान बोरीवली पोलीसांनी आरोपीला अटक केल आहे. गोळीबार का केला याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या घटनेत मयत झालेल्यांचा मृतदेह बोरीवली स्ठानकांवर ठेवण्यात आला आहे. या संदर्भात व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. PTI या वृत्त संस्थेने देखील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे.
पाहा व्हिडिओ
Railway Protection Force (RPF) jawan opens firing inside #Jaipur-#Mumbai train killing four people: Official. The jawan has been arrested and brought to #Borivali Police Station.#MUMBAI #PALGHAR #RPF pic.twitter.com/aR1C6Tw2u7
— mishikasingh (@mishika_singh) July 31, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)