Mumbai BKC Metro Station Fire: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनच्या बाहेर शुक्रवारी आग लागली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, A4 च्या एंट्री आणि एक्झिट गेटजवळ ही आग लागली, ज्यामुळे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर धूर पसरला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सोशल मीडिया वेबसाईटवर एक्स मुंबई मेट्रो 3 ने माहिती दिली की, BKC स्थानकावरील प्रवासी सेवा एंट्री/एक्झिट A4 च्या बाहेर लागलेल्या आगीमुळे तात्पुरती बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, आम्ही सेवांना विराम दिला आहे. MMRC चे वरिष्ठ अधिकारी आणि DMRC साइटवर आहेत, कृपया पर्यायी बोर्डिंगसाठी वांद्रे कॉलनी स्टेशनवर जावे, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

बीकेसीमधील मुंबई मेट्रो स्टेशन 3 बाहेर आग, पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)