Fire at Khadakpada Furniture Market: आज मुंबईतील दिंडोशी हद्दीतील गोरेगाव पूर्वेतील (Goregaon East) रहेजा इमारतीजवळील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये आग लागली. या घटनेची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला (बीएमसीचे एमएफबी) सकाळी 11:19 वाजता देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला लेव्हल 1 ची घटना म्हणून घोषित केलेली आग सकाळी 11:24 वाजता लेव्हल 2 ची झाली. आग सध्या फर्निचर मार्केटमधील 5-6 दुकानांमध्ये मर्यादित आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये परिसरातून काळ्या धुराचे मोठे लोट निघताना दिसत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तथापि, आगीची तीव्रता पाहता, अतिरिक्त अग्निशमन गाड्या पाचारण करण्यात आल्या असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
गोरेगाव पूर्वेकडील खडकपाडा फर्निचर मार्केटला आग, पहा व्हिडिओ -
#Mumbai के गोरेगांव में एक फर्नीचर मार्किट में लगी भीषण आग..सुबह 11 बजे अचानक लगी आग..मौके पर 10 दमकल की गाड़ियां आग बुझाने ने जुटी..हादसे में किसी के घायल होने की खबर नहीं #aag@MumbaiPolice pic.twitter.com/gjKW9am3qj
— Abhishek raghav (@Abhishek4media) January 25, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)